मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (21:43 IST)

Train ticket booking facility: प्रवाशांना रेल्वे तिकिटांसह अनेक विशेष सुविधा मिळतात, त्यांचा फायदा कसा घ्यावा जाणून घ्या

भारतातील करोडो लोक वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर करतात. म्हणूनच भारतीय रेल्वेला भारताची जीवनरेषा म्हटले जाते. मात्र, तिकीट बुक केल्यानंतर भारतीय रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक विशेष सुविधा देते. चला तर मग या विशेष सुविधांबद्दल जाणून घेऊया -
 
1 - विमा - आपल्या पैकी फार कमी जणांना याची माहिती असेल की जेव्हाही आपण प्रवासासाठी तिकीट काढता, त्यावेळी प्रवासासाठी विमा संरक्षणही मिळते. तिकीट बुकिंग दरम्यान, विम्यासाठी फक्त 0.49 पैसे आकारले जातात. प्रवासादरम्यान कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास रुग्णालयाचा खर्च भारतीय रेल्वे उचलते. विम्याच्या अंतर्गत, जर आपल्यावर खाजगी रुग्णालयात उपचार होत असतील, तर भारतीय रेल्वे  2 लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय सुविधा देते.
दुसरीकडे, प्रवाशाचा कोणताही भाग कायमचा अपंग झाल्यास त्याला 7.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते आणि प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, संबंधित कुटुंबातील सदस्यास 10 लाख रुपये मिळतात.
 
2 मोफत वायफाय - भारतीय रेल्वे अनेक स्थानकांवर प्रवाशांना मोफत वाय-फाय सुविधा देते. जर आपण रेल्वे स्टेशनवर असाल आणि आपल्याला इंटरनेटची गरज असेल तर आपण वाय-फाय ची मोफत सुविधा घेऊ शकता.
 
3 प्रतीक्षा कक्ष आणि डॉरमेट्री सुविधा- याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना वेटिंग रूम आणि डॉरमेट्री ची सुविधा देखील प्रदान करते. कोणत्याही कारणास्तव ट्रेनला येण्यास उशीर झाल्यास, आपण  द्वितीय श्रेणीच्या तिकिटावर वेटिंग रूम वापरू शकता. दुसरीकडे, जर आपले  तिकीट एसी क्लासचे असेल तर आपण वातानुकूलित वेटिंग रूम वापरू शकता.
दुसरीकडे, जर आपली ट्रेन सकाळी येणार असेल आणि आपण वेळेच्या खूप आधी स्टेशनवर पोहोचला असाल, तर डॉरमेट्रीच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये  राहण्यासाठी एक खोली मिळेल, ज्यामध्ये झोपण्याची सर्व पुरेशी व्यवस्था असेल.
 
4 प्रथमोपचार - जर दुर्दैवाने शरीराच्या कोणत्याही भागाला गंभीर दुखापत झाली असेल, तर अशा स्थितीत प्रथमोपचाराची सुविधा दिली जाईल. आपण TTE कडून याची मागणी करू शकता. TTE  प्रथमोपचाराचा एक बॉक्स देईल, ज्यामध्ये सर्व आवश्यक औषधे आणि ड्रेसिंगसाठी सर्व उपकरणे असतील.