1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (23:18 IST)

या सरकारी योजनेत रोज फक्त 2 रुपये जमा केल्यावर मिळणार 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कसे

Learn how to get a pension of Rs 36000 by depositing only Rs 2 per day
केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan Yojna). या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल.
 
या योजनेअंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची हमी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल...
 
एका महिन्यात 55 रुपये जमा करावे लागतील
ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील म्हणजेच दररोज 2 रुपयांपेक्षा कमी. म्हणजेच, 18 व्या वर्षी दररोज सुमारे 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते.
 
 जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असेल , तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 
नोंदणी अशा प्रकारे करावी लागेल, यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी नोंदणी करावी लागेल . कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.
 
नोंदणीसाठी तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल, तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर लागेल. याशिवाय, संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत देखील द्यावे लागेल, जेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.