Dharma Sangrah
✕

वेळ वाया न घालवता तत्काळ तिकीट कसे बुक करावे, येथे संपूर्ण पद्धत जाणून घ्या

Updated: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (15:03 IST)
 
AC तात्काळ तिकिट बुकिंगची सेवा सकाळी 10 वाजेपासून सुरू होते. तर स्लिपर क्लाससाठी ही सेवा सकाळी 11 वाजेपासून सुरू होते. 
 
त्यामुळे AC Tatkal Ticket Booking साठी तुम्हाला 9.58 वाजेपासून लॉग इन करावे लागेल. तर स्लिपर क्लाससाठी तुम्हाला 10.58 ला लॉग इन करावे लागेल. या ठिकाणी गेल्यानंतर माय प्रोफाइल MyProfile मध्ये जावून आधीच मास्टर लिस्ट तयार करावी लागणार आहे.
 
ऑनलाइन तत्काळ तिकीट कसे बुक करावे ?
IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://www.irctc.co.in वर जाऊन लॉग इन करावे (यासाठी आयडी असणे आवश्यक आहे) किंवा IRCTC अॅपला भेट देऊ शकता.
MyProfile मध्ये जावून आधीच मास्टर लिस्ट तयार करावी.
येथे तुम्हाला Add किंवा Modify Master List वर क्लिक करावे लागेल. 
नंतर तुम्हाला नॉर्मल, दिव्यांग, पत्रकार यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. 
यामध्ये पॅसेंजरचे नाव, वय, लिंग, सीट प्रिफरेंस, ओळखपत्राचा प्रकार टाकावे लागेल.
ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल. 
नंतर तुम्ही मास्टर लिस्टमध्ये 20 पर्यंत प्रवासी जोडू शकता.
बुकिंग करण्याआधी लॉगिन केल्यास फायदा होईल.
तिकीट बुक करताना तपशील पृष्ठावर My Saved Passenger(s) List पर्यायावर क्लिक करा.
या लिस्टतून ज्यांचे तिकिट करायचे आहे त्यांचे नाव निवडा. असे केल्याने प्रवाशांचे तपशील टाकण्याचा वेळ वाचेल आणि तत्काळ तिकीट लवकर बुक करता येईल.
तुमचे गंतव्यस्थान निवडा आणि तुमची प्रवासाची तारीख भरा. 
'सबमिट' वर क्लिक करा. 
त्यानंतर कोटा पर्यायामध्ये 'तत्काळ' निवडा.
तुमच्या ट्रेनसाठी 'Book Now' वर क्लिक करा.
कॅप्चा कोड एंटर करा आणि तिकिटासाठी ऑनलाइन पैसे भरा.
आता तुमचे तिकीट बुक केले जाईल.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख