1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (20:36 IST)

Train Ticket Booking:तत्काळमध्ये तिकीट बुक करताना ही सोपी युक्ती फॉलो करा, तिकीट त्वरित बुक होईल

online tickit booking
IRCTC Tatkal Booking through Master List:रेल्वे दररोज हजारो गाड्या चालवते परंतु, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढताकधी कधी रेल्वेची संख्या अपुरी असते. कधी कधी अचानक प्रवास करण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. प्रवाशांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, रेल्वेने तत्काळ तिकिटांची सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे लोकांना प्रवास सुरू होण्याच्या 24 तास आधीही कन्फर्म तिकीट मिळते. परंतु अनेकदा असे दिसून आले आहे की जेव्हा लोक घरून तत्काळ तिकिटे काढतात तेव्हा त्यांना आरक्षण मिळत नाही. अशा परिस्थितीत तो एजंटांची मदत घेतो.
 
तत्काळ तिकीट सहज मिळवू शकण्यासाठी असे एक फिचर आहे ज्याचा अवलंब करून आपण तात्काळ तिकीट सहज मिळवू शकता. हे फिचर  IRCTC चे मास्टर लिस्ट फिचर आहे. एसी क्लासचे बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते आणि स्लीपर क्लासचे तत्काळ बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते. अशा परिस्थितीत तुम्ही या मास्टर लिस्ट फीचरद्वारे रेल्वे तिकीटची बुकिंग करू शकता. चला तर मग हे फिचर कसे वापरायचे जाणून घ्या.
 
अनेकदा लोकांना तत्काळ तिकिटे बनवताना, बुकिंग दरम्यानच सर्व जागा भरल्याची समस्या समोर येते. अशा परिस्थितीत, IRCTC ने प्रवाशांच्या मदतीसाठी एक नवीन फीचर जोडले आहे, जे मास्टर लिस्ट फीचर म्हटले जाते. या फीचरच्या माध्यमातून प्रवाशांचे तपशील आगाऊ भरले जातात. जेणे करून बुकिंग करताना,  प्रवाशांचे तपशील भरण्यासाठी वेळ लागत नाही आणि तुम्ही लवकरात लवकर पैसे भरून बुकिंग करू शकता. या फिचरचा वापर करून, तत्काळ तिकीट बुकिंगची प्रक्रिया खूप सोपी होते.
 
मास्टर लिस्ट वापरण्याची प्रक्रिया-
* यासाठी सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
* यामध्ये My Account वर जा आणि My Profile हा पर्याय निवडा.
*  मास्टर लिस्ट जोडा/बदला पर्याय निवडा.
*  प्रवाशाचे नाव, लिंग, बर्थ इत्यादी प्रविष्ट करा.
*  सबमिट बटणावर क्लिक करा.
* यानंतर तुमची मास्टर लिस्ट बनवा.
* त्यानंतर बुकिंग करताना My Passenger List वर क्लिक करा.
*  तुम्ही पैसे देऊन तत्काळ तिकीट सहज बुक करू शकाल.