गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified रविवार, 10 जुलै 2022 (17:40 IST)

आईचे खून करून तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली

मुंबईच्या पूर्व उपनगरात मुलुंड येथे एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या जमीनदात्या आईचे खून करून स्वतःला संपविण्यासाठी धावत्या लोकल ट्रेन समोर उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जय पांचाळ असे या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या आईला छाया पांचाळ यांची हत्या केली आहे. 

वडिलोपार्जित संपत्ती वरून हे दोघे आई आणि लेक डिप्रेशन मध्ये असल्याचे जयच्या वडिलांनी सांगितले. पोलिसांना जयच्या घरातून रक्त वाहत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना  त्याच्या घरी गेल्यावर जयची आई छाया या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या त्यांचा गळा चिरलेला होता. पोलिसांना घटनास्थळी पत्र सापडले त्यात जयने आपल्या आईचा खून केला असून स्वतःचा जीव संपविण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यांनतर त्याने मुलुंड रेल्वे स्थानकात लोकलच्या समोर उडी मारल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. जय हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.