बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (15:09 IST)

क्रिकेट खेळताना दम लागून तरुणाचा मृत्यू

death
पुण्यातील  हडपसर परिसरात  मैदानावर क्रिकेट  खेळत असताना दम लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली असून श्रीतेज सचिन घुले (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील एका मैदानावर ही घटना घडली. रविवारी श्रीतेज हा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यानंतर क्रिकेट खेळत असताना अचानक दम लागल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान श्रीतेज च्या आकस्मिक निधनाची माहिती मिळतात परिसरात शोककळा पसरली. श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले आणि माजी सरपंच श्‍वेता घुले यांचा मुलगा होता. श्रीतेजला मोठा मित्र परिवार होता. त्याचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.