शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 12 जून 2022 (14:53 IST)

Petrol Diesel Price:तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, आज चे दर जाणून घ्या

petrol
तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. नुकतेच सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली आहे.
 
आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. 
 
महाराष्ट्रातील परभणी येथे सध्या देशातील सर्वात महाग पेट्रोल 114.38 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी, आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये सर्वात महाग डिझेल 100.30 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. तेथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
 
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.
 
या पॅरामीटर्सच्या आधारे पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर दररोज ठरवण्याचे काम तेल कंपन्या करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. कर आणि स्वतःचे मार्जिन जोडून ते ग्राहकांना किरकोळ किमतीत पेट्रोल विकतात. हा खर्च पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही जोडला जातो.