मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (18:09 IST)

साताऱ्यात भरदिवसा तरुणाची गोळी झाडून हत्या

Young Man Shot Dead in Satara
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॅरेंट जवळ नटराजमंदिराच्या बाहेर आज दुपारी भर रस्त्यात एका अज्ञात तरुणाचा डोक्यात गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले आहे. अद्याप मयत तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अज्ञात मारेकरी आणि मयत तरुणाचा शोध घेत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी नटराज मंदिराच्या प्रवेश द्वारा समोर भरदिवसात एका तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने गोळी झाडून त्याची हत्या केली.मयत तरुणाचे वय 25 ते 30 वर्ष असल्याचा अंदाज आहे. गोळी लागल्यावर तरुण रस्त्यावर कोसळला. भरदिवसा खून झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
पोलिसांनी प्रकरणाचा शोध लावत आहे. हे खून कोणी केला आणि त्यामागील काय कारण आहे अद्याप समजू शकले नाही.