मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified रविवार, 26 जून 2022 (14:45 IST)

सिंहगड येथे दरड कोसळून ट्रेकिंग साठी गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Sinhgad landslide : सिंहगड येथे काल रात्री दरड कोसळली आणि त्यात अडकून एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे या मयत तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हेमांग आणि त्याचा मित्र शनिवारची सुट्टी असल्यामुळे ट्रेकिंग करण्यासाठी सिंहगड गेले असता अचानक दरड कोसळली. या अपघातात हेमांग हा बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळतातच वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला शोधण्याचे कार्य सुरु केले. अथक परिश्रमानंतर हेमांगचा मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली आढळला. दगडाखाली दबून त्याचा मृत्यू झाला.  हेमंत हा पुण्यातील मित्र मंडळ चौक येथील राहणार होता. त्याला ट्रेकिंगची आवड होती.  हेमंतच्या दुर्दैवी मृत्यूने गाला कुटुंबासह त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. हेमंत कुटुंबातला एकलुता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे
 
सिंहगड एथिक्स  ट्रेकिंग स्पर्धेत हेमंत गाला याच्या सह राज्यभरातील तीनशे ट्रेकर्स सहभागी झाले होते. दरड कोसळल्याच्या घटनेनंतर तो बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. बेपत्ता हेमांगच्या घरी फोन केल्यावर तो घरी देखील पोहोचला नसल्याचे समजले. त्याचा शोध घेतला. अखेर राजगड पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार केली. वन विभागाला ही सूचना दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गड परिसराची पाहणी केली आणि गडाच्या कल्याण दरवाज्याजवळ त्यांना 100 फूट खोल दरीत दरड कोसळल्याचे दिसले. वन विभाग कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी बचाव कार्य सुरु केले असता रात्री त्यांना हेमांगचा  मृतदेह दगडाच्या खाली आढळला .