बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (08:26 IST)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन

Shivajirao Patil Nilangekar
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले. पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना पहाटे 2.15 मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 91 वर्षांचे होते.
 
त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी ते कोरोना मुक्त झाले असल्याचे सांगितले होते. गेल्या महिन्यात 15 जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर 16 जुलै रोजी ते पुढील उचारासाठी लातूरहून पुणे येथील रुबी हॉल मध्ये दाखल झाले होते.
 
वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्याने आज पहाटे त्यांचे निधन झाले. ते मूळ लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी होते. निलंगा गावाहूनच त्यांनी आपली राज्यच नव्हे देशभर निलंगेकर म्हणून ओळख निर्माण केली होती. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 पर्यंत म्हणजेच 9 महिन्याच्या अल्प काळासाठी महाराष्ट्राचे 10 वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय होता. लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते.