बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 14 जानेवारी 2021 (08:31 IST)

आता घरी बसून सुकन्या समृद्धी खात्यातून पैसे ट्रान्स्फर करा, मिळेल तुम्हाला मोठा फायदा …!

केंद्र सरकारकडून मुलींसाठी चालवले जाणारे सुकन्या समृद्धी खाते खूप लोकप्रिय आहे. आजकाल तुम्हाला जर तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आणि अभ्यासासाठी तणावमुक्त व्हायचे असेल तर तुम्ही या सरकारी योजनेत खाते उघडू शकता. एसएसवाय अंतर्गत खाते उघडण्यासाठी सामान्य वयोमर्यादा मुलाच्या जन्माच्या तारखेपासून 10 वर्षे आहे. यावर सरकारकडून व्याजही दिले जाते. आता आपण या खात्यावर पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर देखील करू शकता. कसे ते सांगत आहोत -
 
आपण पोस्ट पेमेंट बँकेद्वारे पैसे जमा करू शकता
आपण पोस्ट पेमेंट बँक खात्यातून या खात्यावर पैसे हस्तांतरित करू शकता. विशेष म्हणजे  की सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत अर्जदार आपल्या मुलीच्या नावे कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसात खाते उघडू शकतात.
 
आपल्याला किती व्याज मिळेल?
व्याज बद्दल बोलायचे झाले तर आपण सध्या या खात्यात 7.6 टक्के दराने व्याज प्राप्त करीत आहात. त्याची मुदतपूर्ती कालावधी 21 वर्षे आणि गुंतवणुकीच कालावधी 15 वर्षे आहे.
 
किती गुंतवणूक करावी लागेल
या योजनेत तुम्हाला एका आर्थिक वर्षात किमान अडीचशे रुपये गुंतवणुकीची गरज आहे. याशिवाय तुम्ही जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
 
IPPB एप द्वारे सुकन्या समृद्धी खात्यात पैसे जमा करा.
>> यासाठी तुम्हाला तुमचे बचत खाते IPPB खात्याशी जोडावे लागेल.
>> आता तुम्हाला DOP Product वर जावे लागेल.
>> येथे सुकन्या समृद्धी योजना खाते निवडावे लागेल.
>> आता तुम्हाला SSY खाते क्रमांक आणि DOP ग्राहक आयडी भरावा लागेल.
>> आता तुमचा हप्ता कालावधी व रक्कम निवडा.
>> पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला आयपीपीबी नोटिफिकेशनच्या माध्यमातून माहिती मिळेल.
 
ही सर्व कागदपत्रे द्यावी लागतील
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला आपल्या मुलीचा जन्म प्रमाणपत्र फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा लागेल. त्याशिवाय मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र (पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ते कोठे राहतात याचे प्रमाणपत्र (पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल) सादर करावे लागेल.