गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: रविवार, 15 मे 2022 (17:06 IST)

कसे कराल: रेल्वे प्रवासादरम्यान सामान चोरीला गेले, काय करावं, जाणून घ्या

भारतात दररोज मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात . यासाठी कोणी बसने प्रवास करतात, तर कोणी अन्य वाहनांतून प्रवास करतात. पण दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात हे नाकारता येणार नाही. ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध असतात, परंतु रेल्वे प्रवासादरम्यान लोकांना सर्वात जास्त चिंता असते आणि ती म्हणजे त्यांच्या सामानाची. वास्तविक, रेल्वेतील सामान चोरीच्या अनेक घटना समोर येत असतात. जिथे बरेच लोक फक्त कपडे आणि इतर गोष्टी घेऊन प्रवास करतात तिथे बरेच लोक त्यांच्या महागड्या वस्तू घेऊन प्रवास करतात. अशा स्थितीत माल चोरीला गेल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जर कधी ट्रेनमध्‍ये तुमच्‍या सामानाची चोरी झाली तर तुम्‍हाला काय करावं लागेल जाणून घ्या.
 
वास्तविक, जेव्हा रेल्वे प्रवासादरम्यान एखाद्याचे सामान चोरीला जाते, तेव्हा अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या सामानाच्या बदल्यात नुकसान भरपाई मिळू शकते. यासाठी तुम्हाला एक छोटी प्रक्रिया अवलंबवावी लागेल.
 
भरपाई कशी मिळवायची?
जर आपण कधी ट्रेनने प्रवास करत असाल आणि यादरम्यान आपले  सामान चोरीला गेले तर अशा परिस्थितीत या चोरीची तक्रार रेल्वे पोलीस दल म्हणजेच आरपीएफकडे करावी लागेल. याबाबत आरपीएफ प्रवाशांना पूर्ण मदत करते.
 
* वस्तूंची माहिती द्यावी लागेल- 
चोरीशी संबंधित माहिती आरपीएफला दिल्यानंतर आपल्याला आपल्या  सामानाची संपूर्ण माहिती त्यांना द्यावी लागेल. उदाहरणार्थ, आपल्याकडे किती बॅग आहे, बॅगमध्ये काय आहे इ. त्यानंतर एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
 
* आपण भरलेल्या या फॉर्ममध्ये याचीही माहिती देण्यात आली आहे. की ,आपले चोरी गेलेले सामान 6 महिन्यांच्या आत न मिळाल्यास अशा परिस्थितीत तुम्ही ग्राहक मंचात तुमची तक्रार नोंदवू शकता.
 
* हे केल्यावर, आपल्याला आपल्या हरवलेल्या सामानाच्या बदल्यात रेल्वे बोर्डाकडून भरपाई मिळेल. येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने ट्रेनमध्ये एखाद्या प्रवाशाचे सामान हरवले तर त्याला भरपाई द्यावी, असे आदेश दिले होते.