1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (23:39 IST)

कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

cast certificate
सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शिफारशी नंतर राज्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र  वाटप  करायला सुरुवात झाली आहे. या साठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात  विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. 
छत्रपती संभाजी नगर मध्ये आत्ता पर्यंत 75 पेक्षा जास्त मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे. कुठून मिळवायचे, यासाठी आवेदन कुठे करायचे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. 
 
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
- 1967 सालच्या पूर्वीचा कुणबी असल्याचा पुरावा असलेले कागदपत्र जसे की जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नमुना न.1 हक्क नोंद पत्रक, सातबाराचा उतारा, आदी कुणबी नोंद असलेले कागदपत्र, पाहणी पत्र, खासरा पत्र, कुळ नोंद वही, प्रवेश -निर्गम नोंद वही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951 चे. उर्दू भाषेत किंवा मोडी भाषेतील कागदांना भाषांतर करून अटेस्टेड केलेले कागदपत्र . 
- अर्जदाराच्या व लाभार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड 
- 100 रुपयांच्या बॉन्डवर केलेले वंशावळ प्रतिज्ञापत्र 
 
आता हे सर्व कागदपत्र घेऊन आपले सरकार केंद्रच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 
अर्ज केल्यावर अर्जाची आणि सर्व कागदपत्रांची तपासणी त्या-त्या तहसीलचे उपविभाग अधिकारी स्तरावर केली जाते. 
त्यानंतर अर्ज कर्त्याने ज्या विभागातून कुणबी असल्याची नोंदणीचे कागदपत्र दिले आहे. त्या विभागाकडून कागदपत्रांची आणि उमेदवाराची पडताळणी केली जाते. उमेदवार खरंच कुणबी असल्याचे निश्चित केले जाते. 
सर्व कागदपत्रे तपासल्यावर उपविभागीय अधिकारी आपल्या स्तरावर उमेदवाराला  कुणबी असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. 
 









Edited by - Priya Dixit