1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:53 IST)

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असल्यास, परत कसे मिळवायचे जाणून घ्या

ऑनलाइन पेमेंट करताना आपण घाईघाईने चुका करतो आणि पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होतात.अशा परिस्थितीत, पैसे परत मिळतात की नाही, जाणून घेऊ या
 
आजकाल बहुतेक पेमेंट आणि मनी ट्रान्सफर फक्त ऑनलाइन केले जात आहे. पण पेमेंट करताना अनेक वेळा आपण घाईघाईने चुका करतो.अशा परिस्थितीत,पैसे चुकीच्या खात्यात म्हणजेच दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर होतात.अशी वेळ कोणत्याही व्यक्ती पुढे येऊ शकते.अशा परिस्थितीत आपण अस्वस्थ होता आणि आपले पैसे कसे परत येतील किंवा येणार नाहीत हे समजत नाही. 
 
जर आपण  पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केले असतील आणि ते दुसर्‍या बँकेकडून आहे आणि जर तो बँक याची परवानगी देत ​​नसेल तर ते अधिक त्रासदायक आहे .म्हणून, आधी आपल्याला हे समजले पाहिजे की आपल्या चुकी मुळे पैसे चुकीच्या खात्यात हस्तांतरित केले गेले आहेत किंवा बँकेच्या काही तांत्रिक बिघाडामुळे असे झाले आहे.  
    
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास काय करावे- 
जर आपण चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर लगेच बँकेला कळवा आणि शाखा व्यवस्थापकाशी बोला. आपल्याला चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केल्याचा पुरावा द्यावा लागेल जेणेकरून त्वरित कारवाई करता येईल.आपण आपली तक्रार ई -मेलद्वारे बँकेतही करू शकता.
 
चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात बँकेचा कोणताही दोष नाही परंतु बँक  केवळ मध्यस्थांची भूमिका बजावते. जर आपले पैसे त्याच बँकेच्या खात्यात ट्रान्सफर केले गेले असतील तर बँक ट्रँजॅक्शन पूर्ववत करण्याची विनंती पाठवेल आणि त्या खातेदाराच्या परवानगीनंतर 7 दिवसांच्या आत पैसे परत केले जातील. जर इतर कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले असतील तर त्याच्या बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना भेटावे लागणार.
 
आपले पैसे परत करण्यास नकार दिला तर काय करावे-
जर ज्या व्यक्तीच्या खात्यात आपण चुकून पैसे ट्रान्सफर केले असतील ती व्यक्ती परत करण्यास सहमत असेल तर आयडी आणि अॅड्रेस प्रूफ सारखी कागदपत्रे त्याच्या बँकेत जमा करावी लागतात आणि त्यानंतर पैसे परत केले जातात. जर त्या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला तर अशा परिस्थितीत हे प्रकरण अवघड होऊ शकते. अशा परिस्थितीत, आपल्या त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवावा लागेल आणि नंतर प्रक्रिया कायदेशीरपणे पुढे जाईल.