रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (08:33 IST)

वाचा, डेबिड कार्ड नसेल तरीही आता कॅश कशी काढता येते ?

एटीएममध्ये गेल्यानंतर डेबिड कार्ड नसेल तरीही आता कॅश काढता येणार आहे. बँकांनी एटीएममध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. SBI, Bank of Baroda आणि ICICI Bankने ही सुविधा सुरु केली आहे. 
 
कसे काढाल पैसे -
 
- सर्वात आधी बँक डेबिड कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देते की नाही हे तपासा.
- जर बँक सुविधा देत असेल तर त्याचं ऍप डाऊनलोड करा.
- SBI ग्राहक असल्यास YONO ऍप डाऊनलोड करा.
- ‘YONO cash option’मध्ये जा, त्यानंतर ‘cash on mobile’पर्यायावर क्लिक करा.
- Bank of Barodaचे ग्राहक असल्यास BOB MConnect plus ऍप डाऊनलोड करा.
- त्यानंतर ‘card-less cash withdrawal’वर क्लिक करा
- ICICI Bank बँकचे ग्राहक असल्यास iMobile ऍप डाऊनलोड करा.
- त्यानंतर‘card-less cash withdrawal’वर क्लिक करा
- त्यानंतर जितकी रक्कम काढायची आहे ती टाईप करा. 
- ट्रान्झक्शन OK करा आणि नंतर बँकिंग ऍपचा PIN टाका
- बँकेकडून एक OTP रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल, हा OTP काही वेळासाठीच असेल.
- त्यानंतर बँकेच्या ATM मध्ये ‘card-less cash withdrawal' पर्याय निवडा.
- मोबाईल नंबर टाका, रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला OTP टाका.
- त्यानंतर तिच रक्कम टाका जी मोबाईल ऍपमध्ये टाकली आहे. त्यानंतर ट्रान्झक्शन पूर्ण होईल.