पावसाळ्यात कच्चं सॅलड खाण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या योग्य पद्धत..  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  सॅलड किंवा कोशिंबीर खाणं खूप फायदेशीर व ते स्वादामध्ये देखील चविष्ट असते. प्रत्येक मोसमात सॅलड किंवा कोशिंबीर खाण्याची पद्धत बदलली पाहिजे, कारण या मुळे शारीरिक त्रास होऊ शकतात.  
				  
	भारतात पावसाळ्याची सुरुवात सहसा जुलै महिन्यापासून होते. या हंग्यामात प्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ लागते, म्हणून बरेच लोकं कच्चं सॅलड किंवा कोशिंबीर खाण्यास सुरुवात करतात. कोशिंबीर खाल्ल्याने शरीरास बरेच पोषक द्रव्ये मिळतात, परंतु मेघऋतूत कच्चं सॅलड आजारांना निमंत्रण देऊ शकतं, म्हणून मेघऋतूत कच्चं सॅलड खाताना कोण कोणती खबरदारी घ्यावयाची आहे जाणून घ्या-
				  													
						
																							
									  
	 
	तज्ज्ञ सांगतात की हिरव्या पालेभाज्या आणि कच्च्या भाज्या खाण्याच्या पूर्वी चांगल्या प्रकारे पाण्यात उकळून घ्या, कारण कीटकांसह अनेक जिवाणू भाज्यांना लागलेले असतात, ज्या मुळे हंगामी रोग होऊ शकतो.
				  				  
	 
	शक्यतो मेघ ऋतूत पालेभाज्या वापरू नये. जसे की कोबी, पालक हे खाऊ नये, कारण या भाज्यांवर असे सूक्ष्म कीटक आणि जिवाणू व विषाणू असतात ज्यांना आपण बघू शकतं नाही आणि हे आपल्या पोटात जाऊन पचन शक्ती बिघडवू शकतात.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	मेघ ऋतूत सॅलड खाताना ते गरम पाण्यात मीठ घालून देखील ठेवू शकता, ज्यामुळे कीटक आणि जिवाणू नाहीसे होतात. पावसाळ्यात काही जंत फळ आणि भाज्यांमध्ये अंडी देतात, जर आपण ते खालले तर ते आपल्या पोटात देखील ते जंत वाढू शकतात.
				  																								
											
									  
	 
	पावसाळ्यात भाज्यांवर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यामुळे शेतकरी फळ आणि भाज्यांवर कीटनाशकाची फवारणी करतात, ज्याचा परिणाम भाज्यांवर अधिक होतो. अश्या परिस्थितीत पावसाळ्यात कच्चं सॅलड नुकसानदायी होऊ शकतं.
				  																	
									  
	 
	ही समस्या उद्भवू शकते -
	 
	पावसाळ्यात कच्चं सॅलड खाऊन पोटाचे आजार जास्त प्रमाणात होतात. कारण पोटात जाऊन हे जंत आपले घर करतात आणि अपचन, गॅस, पचनाचे त्रास, बद्धकोष्ठता सारखे त्रास उद्भवतात. आपणास नेहमी कच्ची कोशिंबीर खाण्याची आवड असल्यास 3 ते 4 महिन्यात जंतनाशक औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं, जेणे करून कोणताही आजार होण्याची शक्यता कमी होते. काही लोकांना सॅलडमध्ये असलेल्या काही विशेष गोष्टींची ऍलर्जी असते, अश्या लोकांनी विशेष काळजी घ्यावयाची गरज आहे.
				  																	
									  
	 
	कच्चं सॅलडचे पर्यायी म्हणून वापर करावं. कच्चं सॅलड शरीराला अधिक प्रमाणात फायबर आणि प्रथिनं देत, ज्यामुळे पचन सुरळीत राहत. एकत्रितरीत्या नव्या पेशी तयार होतात. पावसाळ्यात जर आपल्याला कच्चं सॅलड खाणे टाळावयाचे असल्यास त्याचा पर्यायी स्वरूप घरीच फायबर आणि प्रथिनांसह मोड आणलेले कडधान्य वापरू शकता. कडधान्यात मठ, अख्खे मूग, गावरान चणे, मेथीदाणा मिसळता येईल. खाताना हे लक्षात ठेवावे की मोड व्यवस्थितरीत्या आले पाहिजे. मगच याचे सेवन करावं, जेणे करून यात पोषक तत्त्व वाढतील.