सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (09:09 IST)

मुंबईत दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहावे, पालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबईसह उपनगरात आज (4 ऑगस्ट) आणि उद्या (5 ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकांनी टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आलेले आहे.
 
भारतीय हवामान विभागामार्फत 04 आणि 05 ऑगस्‍ट 2020 रोजी मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची इशारा दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीन विभागाने केलेले आहे. तसेच पालिकेने काही यंत्रणाही तैनात केलेल्या आहेत.