1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (16:33 IST)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे निधन

Mumbai Mayor
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले. सुनील कदम असे त्यांचे नाव होते. त्यांच्या आठवणीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक कविताही पोस्ट केली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुनील कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. 
 
एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर याही होम क्वारंटाइन झाल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर या १४ दिवस होम क्वारंटाइन झाल्या होत्या.