रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (09:25 IST)

भाजपची मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार, शिवसेनेचा मार्ग मोकळा

राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवरच मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक होणार असून, येत्या २२ नोव्हेंबरला मुंबईच्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. मुंबईचे महापौर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे आहेत. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार उतरणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
 
शिवसेना-भाजप युती तुटली आहे. त्यामुळे भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार देण्याची चर्चा होती. मात्र आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नाही त्यामुळे  निवडणूक न लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे,. 
 
असं असलं तरी २०२२ मध्ये मुंबईत भाजपचा महापौर असेल,  याशिवाय भाजप आमदार आशिष शेलार यांनीही आपण तुल्यबळ आहोत मात्र आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधी विचारांच्या जीवावर अभद्रता करणार नाही, असं ट्विट केलं आहे.
 
ॲड. आशिष शेलार
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही... मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही!
 
राज्यात युतीचं बिनसल्याचं भाजपकडून जाहीर कऱण्यात आलं. भाजपने आता आपण महापौर पदाची निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर सेनेचाच महापौर होईल. राज्यातील आर्थिक रीत्या महत्वपूर्ण असलेल्या बीएमसीमध्ये सेनेनं ८४ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने ८२ जागा मिळवल्या असून, काँग्रेसचे ३१ तर राष्ट्रवादीचे ७, समाजवादी पक्षाचे ६ आणि अपक्ष ७ नगरसेवक आहेत. यापैकी अपक्ष ६ नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला होता.