शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (14:58 IST)

मेट्रोविरोधात आंदोलनाला हिंसक वळण; डंपरवर दगडफेक

Violent turnaround against the Metro; Stoneware on a dumper
शिवसेनेने मुंबई येथील गिरगावात मेट्रोविरोधात आंदोलन सुरु केले आहे, आता या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. यातील आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली असून, दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान करण्यात आले आहे. मुंबई मेट्रोसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे इमारतींना तडे जात असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत.
 
शिवसेना नेते पांडुरंग संपकाळ म्हणाले की या मेट्रोच्या कामांमुळे डंपर २४ तास सुरु झाले आहेत. त्यांच्या येण्या जाण्यामुळे परिसरात भयंकर ट्रॅफिक जॅम होत आहे. सोबतच हे रस्ता व्यापून टाकतात त्या डंपरमुळे अपघात होतात. सोबतच रोजचा आवाज आणि गोंगाटामुळे जगणं अत्यंत मुश्किल झालं आहे  जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत, जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना दक्षिण मुंबईच्या विभाग क्र. १२ च्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. गिरगाव आणि ठाकूरद्वार इथे मेट्रो ३ आणि डी. बी. रियालिटी यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी आणि गैरसोय होत आहे.