बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (09:47 IST)

आता एक्स्प्रेस वेवरवरील वाहनांचा वेगावर मर्यादा

वाढते अपघात कमी करण्यासाठी एक्स्प्रेस वेवरवरील वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून केली जात आहे. सध्या या मार्गावर ताशी १२० किमी इतकी वेग मर्यादा आहे. ही वेग मर्यादा रविवारी रात्री १२ वाजल्यापासून ताशी १०० किमी इतकी कमी करण्यात येणार आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
 
अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने निश्चित केलेल्या वेगमर्यादेनुसार एक्स्प्रेस वे वर चालकासह आठ प्रवासी क्षमतेची वाहने यांचा वेग ताशी १०० किमी, नऊपेक्षा अधिक क्षमतेची प्रवासी वाहने ८० किमी, मालवाहू वाहने ८० किमी इतकी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.