1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (17:42 IST)

शिवसेना प्रणीत कॉंग्रेस आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द

महाशिवआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द करण्यत आली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. महाशिवआघाडीचे नेते ओल्या दुष्काळासंदर्भात राज्यपालांना भेटणार होते. त्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र जमणार होते, मात्र ऐनवेळी ही भेट रद्द झाली आहे.
 
याबाबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भेट रद्द झाल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. शिंदेंनी जारी केलेल्या पत्रकानुसार, “शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि या तीनही पक्षांचे एक शिष्टमंडळ आज दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ४.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार होते.
 
मात्र, उपरोक्त तीनही पक्षांचे  महत्वाचे नेते आणि आमदार  ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी तसेच निवडणूक आयोगकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करणेसाठी आपापल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे माननीय राज्यपाल महोदय यांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. माननीय राज्यपाल महोदय यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटीची पुढील वेळ लवकरच कळविण्यात येईल”, असं शिंदे यांनी सांगितलं आहे.