मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

एकाच वेळी इतक्या वर्षांनी शिवसेनेच्या नेत्यांना भेटून कसे वाटले, भुजबळ म्हणतात की....

छगन भुजबळ हे सर्वात आधी शिवसैनिक होते, मात्र त्यांनी शिवसेना सोडून अनेक वर्ष झाले आहेत. तरीही त्यांचे शिवसेनच्या अनेक नेत्यांसोबत चांगले सबंध आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला असून, हा मसूदा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना पाठवला जाणार आहे.

या  तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीतील नेत्यांनी याची माहिती माध्यमांना दिली. विशेष म्हणजे शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या छगन भुजबळ यांना पत्रकारांनी इतक्या वर्षांनी शिवसेना नेत्यांना भेटून कसं वाटलं असाही प्रश्न विचारला होता. तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले यांनी सांगितले की  “ शिवसेना नेत्यांची अनेक वर्षांनी भेट झाली असून  आम्ही सर्वांनी एकत्र येत  बसून चर्चा केली आहे.  हा योग चांगला होता. मात्र यावेळी  शिवसेना नेत्यांना फक्त  मीच भेटलो असं नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्वच नेते भेटले आहेत. आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही बैठक झाली असून,  दोन दिवस ही बैठक सुरु राहिली. त्यात आम्ही शेतकरी, महिला, रोजगार, अल्पसंख्यांक, ओबीसी, एससी, एसटी अशा सर्वांसाठी एक कार्यक्रम बनवला आहे. त्यात अजून काही सुधारणा असतील तर आमचे पक्षप्रमुख ते सांगतील. त्याप्रमाणे त्यात काही बदल होऊ शकेन.”