गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (15:59 IST)

बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ आता व्हायरल

Balasaheb Thackeray's video is now viral
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढतानाचे जुने व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ साली एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्याबरोबर आघाडीची शक्यता फेटाळून लावताना ‘हलकट’ हे शब्द वापरले होते. तोच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
 
शिवसेनाप्रमुखांना त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले की, “राजकारणात शक्यता असते म्हणजे काय? हा हलकट माणसांचा खेळ असेल तर तुम्हाला ठरवायचे आहे की, तुम्ही सदगृहस्थ बनून राहणार की, हलकट बनणार. कोणी हलकट बनण्याचे ठरवेल असेल तरी मी हलकट माणसांबरोबर जाणार नाही”हे बाळासाहेबांचे त्यावेळचे उदगार होते.
 
अटल बिहारी वाजपेयींचे सरकार पाडण्यासाठी जो माणूस जबाबदार आहे त्याच्याशी हातमिळवणी करणे कसे परवडेल? मी तरी अशा पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. शत्रू शत्रू असतो असे बाळासाहेबांनी स्पष्ट केले होते.