शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (09:39 IST)

हा तर राज्यातील जनतेचा अपमान : राज ठाकरे

This is an insult to the people of the state: Raj Thackeray
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुठलाही पक्ष सत्तास्थापन करु न शकल्याने अखेर  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
 
“राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांवर टीका केली. त्यांनी ट्वीट करत राष्ट्रपती राजवटीवर संताप व्यक्त केला आहे.