शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (10:08 IST)

राऊत यांची प्रकृतीत बिघाड, डॉक्टरांनी सांगितले हे कारण

शिवसेना खासदार संजय राऊत  यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस आढळले असून, राऊत हे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले. लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे तर त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस सापडले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात येत आहे. लीलावती रुग्णालयात डॉ.मॅथ्यू हे संजय राऊतांची अँजिओप्लास्टी करीत आहेत. मात्र राज्यातील सत्ता स्थापन करतांना संजय राऊत मुख्य भूमिकेत होते, त्यात आलेला मोठा तणाव आणि इतर कारणे यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे.
 
संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीला उपस्थित झाले, संजय राऊत यांना प्रकृतीचा त्रास होत असल्याने ते थेट रुग्णालयात गेले.  त्यांना अस्वस्थ वाटू लागत असल्याने रुग्णालयात जावं लागलं. संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी झाली. त्यामध्ये त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांची आता अँजिओप्लास्टी सुरु आहे. राऊत सध्या 11 व्या मजल्यावर विशेष कक्षात आहेत.
 
त्यांचे बंधू सुनील राऊत, कुटुंबातील सदस्य प्रवीण राऊत, सुजित पाटकर तसेच शिवसेना पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी, संजय सावंत त्यांच्या सोबत आहेत.