बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (09:54 IST)

काळजीवाहू सरकारच्या कार्यकाळातील सर्व खासगी ओएसडींना कर्तव्यातून मुक्त करा - आ. नवाब मलिक

महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार असल्याने त्यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेल्या सर्व खासगी ओएसडींना त्वरित त्यांच्या कर्तव्यापासून मुक्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी केली आहे.
 
या काळजीवाहू सरकारकडे राज्यातील महत्त्वाच्या फाइल्स असून त्या फाइल्सची यादी #राज्यपाल महोदयांनी तातडीने मागवून घ्यावी कारण परत त्याच मागील तारखांचे आदेश ते काढण्याची शक्यता आहे अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.