सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (09:28 IST)

शेवटी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र

राज्यात भाजप आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपद हवे म्हणून स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोघातील वाद आता विकोपाला गेला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे भाजपने शब्द फिरवला असून, खोटे बोलू नका असे सांगत, मला तुम्ही वेगळे पर्याय तपासायला सांगू नका असे देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता अजूनतरी दूर आहे. असे दिसते आहे. त्यात आता पुणे येथील कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याकडून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटे असलेला फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सची शहरभर काय पूर्ण राज्यात चर्चा सुरु झाली  आहे.
 
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ पूर्ण झाले आणि मावळते मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळावा अशी मागणी जोर  लावून धरली असून, त्यामुळे  चांगलेच राजकारण तापले आहे. त्यात मोठा पक्ष ठरलेला भाजपाही मागे हटण्यास तयार नाही. त्यामुळे मावळत्या विधानसभेची मुदत आज संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नियमानुसार राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून, आता जबाबदारी पार पाडत आहेत. सर्व राजकीय घडामोडी घडत असताना पुण्यातील कोंढवा भागात एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यावरील महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे…! बळीराजाच्या मनातील अन हातातील घड्याळाच्या अचूक वेळेने, धनुष्यबाणातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा…! अशा आशयाचा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे आता हे तिघे फक्त फ्लेक्स पुरते आहेत की खरच एकत्र येत सत्ता स्थापन करणार अशी जोरदार चर्चा आहे.