मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अद्याप कोणताही निर्णय नाही, आधी किमान समान कार्यक्रम ठरेल

शिवसेनेसोबत जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आधी दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा होईल. किमान समान कार्यक्रम ठरेल, त्यानंतरच आम्ही शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण काँग्रेस-राष्ट्रवादीने दिले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. मात्र, या बैठकीत सेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.  
 
शिवसेनेच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. काँग्रेसचे नेते अहमद पटेल म्हणाले की, सर्वप्रथम राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बोलणी होतील. त्यानंतर शिवसेनेच्या प्रस्तावावर विचार केला जाईल.