राम मंदिराच्या निर्मितीसाठी लोकनिधी जमवण्याचा विहिंपचा निर्णय
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषदेनं घेतला आहे. राम मंदिरासाठी लोकनिधी गोळा करण्यासह रामभक्तांची मदतही केली जाणार आहे.
"राम मंदिर उभारणीत हातभार लावण्यासाठी देशभरातील रामभक्तांना आवाहन केलं जाईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठीचा लढा हा असंख्य हिंदूंच्या श्रद्धा आणि भावनांशी जोडला होता. त्यामुळे ते सर्वजण थोडाफार हातभार लावतील," असं विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितलं.
लोकनिधीसंदर्भातील नेमका नियोजन काय असेल, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असंही बन्सल यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे, देशभरातील 718 जिल्ह्यांमधून रामभक्तांचं शिष्टमंडळ अयोध्येत बोलावलं जाईल आणि अयोध्येच्या बांधकामासाठी मदत केली जाईल. कारसेवेसारखाचा हा भाग असेल, असेही संकेत बन्सल यांनी दिले.