मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (12:09 IST)

PMC बँकप्रकरणी दोन ऑडिटर्सना अटक

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकप्रकरणी दोन ऑडिटर्सना अटक करण्यात आलीये. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीये. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिली आहे.
 
या ऑडिटर्सना आधी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या ऑडिटर्सनी बँकेच्या अनियमिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का, याची चौकशी करण्यात आली होती.
 
मुंबईतील स्थानिक कोर्टात या दोन्ही ऑडिटर्सना हजर केलं जाईल, त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.
 
विशेष म्हणजे, हे दोन्ही ऑडिटर्स HDIL या रिअल इस्टेट फर्मशीही संबंधित असल्याचं चौकशीत समोर आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.