मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (15:05 IST)

महाराष्ट्र सत्तासंघर्ष : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक; शिवसेना NDAतून बाहेर?

काल भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली होती. शिवसेनेला राज्यपालांनी आज संध्याकाळी 7.30 पर्यंत वेळ दिला असून शिवसेनेचे केंद्र सरकारमधील मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 
2.41: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक संपली आहे. आता या बैठकीतून दोन्ही पक्षांनी घेतलेले निर्णय पुढील घडामोडींची दिशा ठरवतील.
 
1.38 : 30 मे रोजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीवार्दाने मी शपथ घेतली. त्यानंतर मला अवजड उद्योगाची जबाबदारी मी पार पाडली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी जो निर्णय झाला तो झालाच नाही हे सांगून फसवलं . उद्धव ठाकरेंना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. अशा वातावरणात मी कारभार करावा हे उचित नाही. त्यामुळे मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवला आहे असं माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत म्हणाले. मी राजीनामा दिला याचा अर्थ काय आहे हे तुम्ही समजून घ्या असं सूचक वक्तव्य केलं. मेहबुबा मुफ्ती, मायावती आणि नितीशकुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन करताना कोणती विचारधारा होती? असा सवालही त्यांनी केला.

12. 26 : जोपर्यंत काँग्रेसचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्ही निर्णय कळवणार नाही. त्यांचा निर्णय आल्यावर आम्ही आमची भूमिका ठरवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.
 
12.18:आज कोअर कमिटीची बैठक संपली. चार वाजता पुन्हा बैठक घेणार आणि महाराष्ट्राच्या नेत्याशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय होईल.- मल्लिकार्जून खरगे
11.59: कोण कसं सरकार स्थापन करेल हा मुद्दा नाही. मात्र राज्यात अस्थितरेची शक्यता नाकारता येत नाही. पुडे निवडणुका झाल्यात काँग्रेस शिवसेनेबरोबर लढणार का? असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे. राज्यात 2020 मध्ये निवडणुका होतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.