मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Updated : रविवार, 24 ऑगस्ट 2025 (11:08 IST)

क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू जयंती

rajguru
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू ह्यांचा जन्म 24 अगस्त1908 रोजी पुणे जिल्हाच्या खेड येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीला गेले आणि तिथे एका व्यायाम शाळेच्या वातावरणात देशभक्तीचे धडे घेतले.
कमी वयातच ते बनारसला संस्कृत शिकण्यासाठी आले. ह्यांचा संस्कृत आणि मराठी भाषेच्या व्यतिरिक्त इंग्रजी, कन्नड, मलयाळम,हिंदी, उर्दू या भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा युद्धपद्धतीचे कौतुक होते. येथेच ते अनेक क्रांतिवीरांच्या संपर्कात आले. चंद्रशेखर आझाद सचिन्द्रनाथ सान्याल इत्यादींशी भेट झाली. ते हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल होऊन उत्तर भारतात क्रांतिकार्यात भाग घेतले.
त्यांना त्यांच्या टोपण नाव रघुनाथ नावाने ओळखले जात होते.त्यांच्या बंदुकांचा नेम अचूक होता. चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंह आणि यतींद्रनाथ त्यांचे चांगले मित्र होते. ब्रिटिश पोलीस अधिकारी सँडर्सवर हल्ला करण्याच्या चळवळीत त्यांनी भगत सिंह आणि सुखदेव याना पुरेपूर साथ दिला. सँडर्स वर पहिल्या दोन गोळ्या राजगुरू ह्यांनी झाडल्या.
ते पुण्यातून पकडले गेले तिथे त्यांना अटक करण्यात आली  आणि अखेर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह आणि सुखदेव ह्यांच्या सह त्यांना लाहोरच्या सेंट्रल  कारावासात सुळावर चढविण्यात आले. त्यांनी देशासाठी मरण पत्कारून आपले नाव हुतामांच्या यादीमध्ये नोंदविले आहे .त्यांच्या स्मरणार्थ खेड या गावाचे नाव राजगुरुनगर असे नामांतरित केले आहे.  
Edited By - Priya Dixit