दिल्लीत फी वाढीविरोधात JNU च्या शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं आहे. फी वाढ, ड्रेस कोड आणि संचारबंदी अशा मुद्द्यांना या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला.
जेएनयूच्या कॅम्पसबाहेर झालेल्या निषेध मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीतल्या फ्रीडम स्वेअरपासून एआयसीटीई ऑडिटोरिअमपर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
गेल्या दोन आठवड्यापासून जेएनयूचे विद्यार्थी नव्या हॉस्टेल नियमावलीविरोधात आंदोलन करत आहेत. हॉस्टेलच्या फीमध्ये वाढ करण्यात आलीये. कर्फ्यू आणि ड्रेसकोड लागू करून निर्बंध लादले जात आहेत, असं जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता आयशे सिंह याने सांगितलं.