राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेकडून याचिका दाखल
राज्यपालांनी तीन दिवसांची मुदत वाढवून न दिल्याने सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्या. शरद बोबडे ही सुनावणी घेणार आहेत. तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.
राष्ट्रपतींनी सत्तास्थापनेसाठी दिलेली २४ तासांची वेळ ही कमी होती. त्यामुळे शिवसेनेने राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी तीन दिवसांची वेळ वाढवून मागितली होती. मात्र आम्हांला ही वेळ वाढवून देण्यास नकार दिला होता. दरम्यान, भाजपला तीन दिवस देण्यात आले. मात्र, शिवसेनेला कमी वेळ दिला गेला. तसेच मुदही वाढवून दिली गेली नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.