शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (09:34 IST)

असे असेल मंत्रिमंडळ हा ठरणार आहे सत्तेचा फॉर्म्युला

सर्वाना आता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे तर भाजपने दिलेला शब्द फिरवला त्यामुळे शिवसेना स्वतः सरकार बनवणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हा पर्याय समोर आला आहे. आता पर्यंत आघाडी आणि शिवसेना यांच्यात बोलणी जरी झाली नसली तरीही राजकीय विश्लेषक यांनी मात्र सत्ता कशी असणार आहे स्पष्ट केले आहे. 
 
भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत, वाटाघाडी मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि इतर खात्यांसंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहेत. तर कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, तो किती वर्षांसाठी असेल, कोणत्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असेल तोही किती वर्षांसाठी असेल, याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू असून, शिवाय कोणत्या पक्षाला कोणत्या किती मंत्रिपदे असावीत, यावर एकमत होण्यासाठी धडपड सुरू असल्याचे समजते.
 
शिवसेनेला कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्रिपद हवेच आहे. त्यांनी भाजपाशी असलेली युतीही तोडली आहे. त्यामुळे शिवसेना या महाशिवआघाडीतही मुख्यमंत्रिपदासाठी अडून आहे. शिवसेनेचे संख्याबळ ५६ आहे, त्यापेक्षा राष्ट्रवादीकडे केवळ २ आमदार कमी आहेत. ५४ आमदारांचे बळ असलेली राष्ट्रवादीही पहिल्या टर्मसाठी आग्रही राहू शकतणार आहे. जर असे झाले तर अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेतले जाणार आहे. काँग्रेसच्या वाट्याला यात ५ वर्षांसाठी उपमुख्यमंत्रिपद येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी या पदावर समाधान मानावे लागेल. कारण, ”सत्तेत सहभागी झालो नाही तर राज्यातील काँग्रेस संपेल,” असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला आहे.
 
या महाशिवआघाडीची सर्व समीकरणे जुळून आली तर पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचे मुख्यमंत्री, दुसऱ्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्याला मिळेल. काँग्रेसकडे ५ वर्षे उपमुख्यमंत्रिपद असेल.महाराष्ट्रात जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात. त्यात एक मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री सोडला तर उरतात ४१ मंत्रिपदे. त्यातील मंत्रिपदांचे वाटप संख्याबळानुसार केले जाऊ शकते. त्यात शिवसेनेला १४, राष्ट्रवादीला १३ ते १४ आणि काँग्रेसला ११ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.