बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रवारी – मार्च २०२० मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० तर बारावीची परीक्षा १८ फेब्रवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे.
 
या बरोबरच, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.
 
शिक्षण मंडळाचे हे अंतिम वेळापत्रक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी आहे. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra,gov,in अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १० ऑक्टोबर २०१९ पासून उपलब्ध असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.
 
तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली वेळापत्रक ग्राह्य धरू नये, परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने छापील स्वरुपात दिलेली वेळापत्रकेच अंतिम असतील. या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून पालकांसह विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.