मुंबईत N 95 चे बनावट मास्क विक्री करणाऱ्या आरोपीला अटक

Last Modified शुक्रवार, 31 जुलै 2020 (08:53 IST)
कोरोना संकटांच्या काळात अनेक दुकानदारांपासून ते हॉस्पिटल पर्यंत अनेकजण गैर मार्गानं खिसे भरले जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यातलीच एक घटना म्हणजे मुंबईत एन ९५ मास्कच्या नावान अनेक बनावट मास्क विकले जात आहेत. अशाच एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
कोरोनापासून खबरदारीचे उपाय म्हणून नागरिक सॅनिटायझर, मास्कची खरेदी करतात. पण या संकटातही सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. क्राइम ब्रँचच्या युनिट ३ च्या पथकानं बनावट एन ९५ मास्क (N 95 Mask) विकणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपये किंमतीचे मास्क जप्त करण्यात आले आहेत.
सफदर हुसैन मोमिन असं या आरोपीचं नाव आहे. डीसीपी अकबर पठाण आणि निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे बनावट मास्क जप्त केले आहेत.
व्हिनस कंपनीच्या नावाखाली हे मास्क तयार करून विकले जात होते. याबाबत कंपनीला माहिती मिळाली असता, त्यांनी पोलिसांत कळवले. त्यानंतर पोलिसांनी गोदामावर छापेमारी केली. या कंपनीचे एन ९५ मास्क हे देशभरातील अनेक रुग्णालये आणि अन्य ठिकाणी डॉक्टरांकडून वापरले जात आहेत.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

CBI: काय आहे सीबीआय चा इतिहास, कोणत्या परिस्थितीत आणि ...

CBI: काय आहे सीबीआय चा इतिहास, कोणत्या परिस्थितीत आणि प्रकरणात होते सीबीआय चौकशी ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा संशयित मृत्यू नंतर तपास संस्था (इन्‍वेस्‍टि‍गेशन एजेंसी) ...

तिरंगा फडकवण्याचे हे नियम, जाणून घेणे आवश्यक

तिरंगा फडकवण्याचे हे नियम, जाणून घेणे आवश्यक
तिरंग्याला बिगुलच्या आवाजासोबत फडकवले जावे आणि उतरवले जावे.

कोरोनाच्या पाश्वर्वभूमीवर पुणेकरांसाठी गणपती विसर्जनाबाबत ...

कोरोनाच्या पाश्वर्वभूमीवर पुणेकरांसाठी गणपती विसर्जनाबाबत नविन नियम
कोरोनाचं सावट मुंबईनंतर पुण्यातही वाढीस लागलं आहे. १ लाखाहून अधिक कोरोनाबाधितांचा आकडा ...

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १३ ऑगस्टपासून शिथिल होणार

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १३ ऑगस्टपासून शिथिल होणार
कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात ...

कोरोनाबळींचा देशातील आतापर्यंतचा उच्चांक

कोरोनाबळींचा देशातील आतापर्यंतचा उच्चांक
देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार रुग्णांची भर पडली असून, १,००७ मृत्यूंची नोंद झाली. एका ...