मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2020 (07:40 IST)

मुंबईत मद्याची दुकाने बंद, आयुक्तांचा आदेश

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्रकच त्यांनी जारी केले आहे. लॉक डाऊन मधून दारूचे दुकान (वाईन शॉप) यांना वगळण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोमवारपासून मुंबईत वाईन शॉप सुरू झाले. मात्र वाईन शॉप वर उसळलेली तळीरामांची गर्दी लक्षात घेऊन, पालिका आयुक्तांनी मुंबईत पुन्हा दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबई दारू मिळणार नाही.
 
मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या मुलुंड, घाटकोपर, अंधेरी, भागात अनेक वाईन शॉप समोर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे  सोशल डिस्टेंसिंगचा खेळखंडोबा झाला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री अचानक पालिका आयुक्त यांनी मुंबईतील वाईन शॉप पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारपासून मुंबईत पुन्हा दारूबंदी लागू होणार आहे. 
 
मुंबई कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूची दुकान वगळता, अन्य सर्व दुकान बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबईत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मेडिकल स्टोअर, भाजी मार्केट खुले राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना शिवाय अन्य दुकाने उघडणार नाहीत, याची विभागातील सहाय्यक आयुक्तांनी काळजी घ्यावी. वेळ पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.