मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 4 मे 2020 (06:53 IST)

मुंबईत गेल्या २४ तासांत ४४१ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद तर 21 जणांचा मृत्यू

मुंबईत गेल्या २४ तासांत नव्या ४४१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या आता ८ हजार ६१३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंतच्या मृतांची संख्या ही ३४३ झाली आहे. यासह कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत एकाच दिवसांत ९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पालिकेने केलेल्या ४६९ चाचण्यांमधून आजची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात ३० एप्रिल ते १ मे या कालावधीत झालेल्या आणि पॉझिटिव्ह निघालेल्या ६० अहवालांचा समावेश असल्याचं पालिकेने जाहीर केलं आहे. मुंबईत रुग्णांच्या वाढत्या संख्येसह कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा देखील वाढत आहे. एका दिवसांत १०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांचा आकडा हा १८०४ इतका आहे.