शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (09:09 IST)

कोरोनात आरोग्य सांभाळणारा 'हा' साबण ठरलाय नंबर वन

कोरोना काळात जंतू मरावे यासाठी हात धुन्यासाठी साबणाचा वापर मोठ्या प्रमाणावर सर्वत्र  वाढला आहे. यामुळे भारतीय साबण बाजारातही फार मोठा बदल झाला आहे. यामुळे डेटॉल साबाणाकडे  लोकांचा ओढा वाढला असून या साबणाची विक्रीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे आता डेटॉल हा भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा साबण बनला आहे. डेटॉल साबण विक्रीच्या बाबतीत पहिल्यांदाच क्रमांक एकवर पोहोचला आहे. डेटॉलने हिंदुस्तान युनीलिव्हरचे दोन प्रसिद्ध साबण लाईफबॉय  आणि लक्सलाही  फार  मागे टाकले आहे.
 
जागतिक विक्रीत झाली लक्षणीय  वाढ -
साबणांच्या उपयोग आणि परफॉर्मन्सचा विचार करता, याच्या जागतीक विक्रीत 62 टक्के वाढ झाली आहे. डेटॉलच्या भारतीय बाजारातील शेअरमध्ये 430 बेसिस पॉइंटची वाढ दिसून येते आहे. मागील वर्षी  2019 मध्ये भारतीय साबण बाजारात लाईफबॉयचा शेअर 13.1 टक्के एवढा होता. तर डेटॉलचा शेअर 10.4 टक्के होता. दुसऱ्या स्थानावर गोदरेज (Godrej) ब्रँड आहे. याचा बाजारातील शेअर 12.3 टक्के होता. गेल्या दोन वर्षांत डेटॉलच्या मार्केट शेअरमध्ये मोठी वाढ दिसून येतेय.  झाली आहे. 2017 मध्ये भारतीय बाजारात डेटॉलचा शेअर 9.7 टक्के होता. तो 2019 मध्ये वाढून 10.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.. डेटॉलच्या मार्केट शेअरमध्ये 430 bps ची वाढ झाली आहे. 1 bps म्हणजे एका बेसिस पॉइंटचा शंभरावा भाग असतो.