मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (15:45 IST)

पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीत तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीतील तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पालखेड एमआयडीसीतील संबंधित कंपनी तातडीने बंद करण्यात आली आहे.
 
नाशिक जिल्ह्यात दिंडोरीतील पालखेड औद्योगिक वसाहतीत पीपीई किट तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीतील तब्बल 44 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्व कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या कोव्हिड सेंटर मध्ये ठेवण्यात आलं आहे. तर कंपनीतील इतर कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला लॉकडाऊनमध्येही काम सुरु ठेवण्याची मुभा होती. मात्र मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त कर्मचारी आढळल्याने कंपनी बंद करण्याची वेळ आली आहे.