मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (09:12 IST)

राजेश टोपे यांची कोरोना बेडबाबत केली महत्वाची घोषणा

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंक ठिकाणी रुग्णांना आता उपचारासाठी बेड मिळणेही फार अवघड  झाले आहे असे चित्र दिसतंय. त्यामुळे  या अवघड स्थितीत नाशिकमध्ये शासनाच्या वतीने कॉल सेंटर सुरु केले जाणार आहे. अशी  महत्वपूर्ण घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. मात्र जगातील  लॉकडाऊन  करण्याचा प्रघात पाहता, त्यानुसार नाशिक शहरात लगेचच लॉकडाऊन करायची गरज नाही, मात्र पुढे गरज पडल्यास लॉकडाऊनचा विचार होईल असेही टोपे यांनी स्पष्ट केलं.  
 
पुढे टोपे म्हणाले कि. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांची भरती मेरिट पद्धतीने करण्यात येईल.  सोबतच इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन वाढवणार, डेड ऑडिट कमिटीची स्थापना, अ‍ॅण्टीजेन टेस्ट वाढवणार आहेत. डॉक्टरच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आपल्या कामकाजात आयएमएला सहभागी करुन घेणार आहे. मालेगावमधील बर्‍या झालेल्या कोरोना रुग्णांचा प्लाझ्मा वापरुन नाशिकमध्ये प्लाझ्मा बँक सुरु करणार. बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री याना सादर केला करणार आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री लोकडाऊनचा निर्णय घेतील असेही टोपे यांनी स्पष्ट केले. मात्र जगातील  लॉकडाऊन  करण्याचा प्रघात पाहता, त्यानुसार  नाशिक शहरात लगेचच लॉकडाऊन करायची गरज नाही, मात्र पुढे  गरज पडल्यास लॉकडाऊनचा विचार होईल असेही टोपे यांनी स्पष्ट केलं.