शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2020 (15:42 IST)

कोरोनाची सौम्य लक्षण असेलेल्या रुग्णांना घरी पाठवा’, पुणे मनपाचा निर्णय

राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी झालं असलं तरी पुण्यात मात्र कोरोना रूग्ण सध्या झपाट्याने वाढत आहेत. पुणे शहरात काल म्हणजे १७जुलैला नव्याने १,७०५ कोरोनाबाधितरुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३४,०४० झाली आहे. पुण्यात रूग्णसंख्या वाढत असताना हास्पिटल्समध्ये नविन रूग्णांसाठी बेडच शिल्लक नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जागा मिळावी, यासाठी आता अत्यंत कडक पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यात खाजगी रूग्णालयांमध्ये बेड्स अडवून बसलेल्या asymptotic रुग्णांना घरी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
 
पुण्यामध्ये सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अति सौम्यलक्षणं असलेले रूग्ण अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोनाबाधित म्‍हणून उपचारघेत असलेल्‍या तथापी, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरी पाठवण्‍यात यावं, असे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे.
 
कोरोनाची सौम्‍य लक्षणे असलेल्या किंवा कोणतीही लक्षणे नाही मात्र असे रुग्‍णघरी जाण्‍यास नकार देत असतील तर त्‍यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्‍यात यावी, असंही जिल्‍हाधिकारी राम यांनीकळवले आहे.