रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (09:03 IST)

कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

राज्यात गुरुवारी ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.