मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2020 (14:41 IST)

अक्षयकुमारचा 'तो' नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात

बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार (Bollywood actor Akshay Kumar) याचा नाशिक दौरा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लॉकडाऊनचे नियम डावलून अक्षयकुमारला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. 
 
ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एसकोर्ट कसा ? या प्रकरणाची पालकमंत्री छगन भुजबळांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे दिले आहेत. 
 
मुख्यमंत्र्यापासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
 
अक्षय कुमार (Bollywood actor Akshay Kumar) नुकताच नाशिकदौऱ्यावर आला होता. त्र्यंबकेश्वकरला तो हेलिकॉप्टरनं दाखल झाला होता. एवढच नाही तर अक्षय एक दिवस मुक्काशमी राहिला होता.
 
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यात एकूण 4864 कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी कोविड सेंटरची पाहणी केली.
 
ठक्कर डोममध्ये 350 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. निमा संस्थेतर्फे ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे.  ज्या व्यवस्था कमी पडतील त्या शासनाच्या वतीने केले जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली.
 
शहरातील रुग्णालयात पुरेशा जागा शिल्लक आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आपत्कालीन व्यवस्था म्हणून ठक्कर डोममध्ये 350 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
खासगी हॉस्पिटलचे अधिकार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना आहेत. कर्फ्युला मिळालेला प्रतिसाद बघून लॉकडाऊनचा निर्णय घेऊ, असं ही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.