बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (22:15 IST)

काय म्हणता, अक्षय सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलीब्रेटीच्या यादीत

अभिनेता अक्षय कुमार जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलीब्रेटीच्या यादीत सामील झाला आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींची २०२० या वर्षातील यादी प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या फोर्ब्सच्या यादीमध्ये केवळ अक्षय कुमारचाच समावेश आहे. 
 
यावर्षी १०० लोकांच्या यादीत अक्षय कुमार ३६ हजार ५२५ कोटींची कमाई करून ५२ व्या स्थानावर खिलाडी कुमार आहे. या यादीमध्ये सामील झाल्यानंतर अक्षयने बॉलिवूड कलाकार विल स्मिथ आणि जेनिफर लोपेझ यांना मागे टाकले आहे. यासह अक्षयने प्रसिद्ध हॉलिवूड गायक रिहानालाही मागे टाकले आहे. २०१९ च्या तुलनेत यंदाच्या क्रमवारीत थोडीशी घसरण झाली असून मागील वर्षी अक्षय कुमार ४९० कोटींच्या कमाईसह ३३ व्या क्रमांकावर होता.