बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (11:01 IST)

4.75 कोटी Truecaller अॅप यूजर्सला पसर्नल डेटा हुआ लीक, यात आपला नंबर तर नाही...

कोरोना व्हायरसच्या थैमानात जगभरात सायबर क्राइमचे प्रकरण वाढले आहेत. आता नवीन प्रकरण फोनमध्ये असलेल्या truecaller या अॅप्लिकेशनबद्दल आहे, ज्याद्वारे इनकमिंत कॉल ओळखता येतात. truecaller वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास 4.75 कोटी भारतीय यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. 
 
truecaller वर मिळालेल्या ग्राहकांची माहिती 75000 रुपयांसाठी विकणार असल्याचा दावा एका सायबर गुन्हेगारानं केला आहे. ऑनलाईन गुप्तचर यंत्रणा सायबर सेलकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. हा डेटाबेस कंपनीच्या नावाचा वापर करुन विकला जात आहे, जेणेकरून कंपनीची बदनामी आणि या आरोपीचा डाटा विश्वासहार्य वाटेल.
 
truecaller वरील एका प्रवक्त्यानं हा दावा मात्र फेटाळून लावला आहे. ट्रू कलरच्या प्रवक्त्याने सांगितले की आमच्या डेटाबेसमध्ये कोणतीही चोरी झालेली नाही आणि आमच्या सर्व ग्रहाकांची माहिती सुरक्षित आहे. आम्ही आमच्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि आमच्या सेवांची अखंडता खूप गंभीरपणे घेत आहोत आणि आम्ही संशयास्पद हालचालींवर सतत नजर ठेवतो.
 
प्रकरण उघडकीस आणणार्‍या इंटेलिजेंस फर्म Cyble ने एका ब्लॉगमध्ये पोस्ट केले की आमच्या रिसर्चर्सला एक मोठ्या सेलरबद्दल माहीती मिळाली आहे, जो 475 कोटी इंडियन ट्रूकॉलर रेकॉडर्स विकत आहे ज्यांची किंमत 1000 डॉलर ठेवण्यात आली आहे. हा डेटा 2019 चा असून यात फोन नंबर, जेंडर, शहर, मोबाई, नेटवर्कच्या नावापासून फेसबुक आयडी देखील सामील आहेत.
 
उल्लेखनीय आहे की सायबर गुन्हांवर नजर ठेवणार्या ऑनलाइन खुफिया कंपनी सायबलने अलीकडेच उघडकीस आणले होते की सायबर गुन्हेगार सुमारे 3 कोटी भारतीयांची खासगी माहीती डार्क वेबवर लीक केली आहे. कंपनीप्रमाणे हॅकर्सने नोकरी करु इच्छित लोकांचा ऑनलाइन डेटा डार्क वेबवर लीक केला ज्यात त्यांच्या घराचा पत्ता आणि मोबाईलसह अनेक माहीती सामील आहे. यापूर्वी देखील कंपनीने फेसबुक आणि ऑनलाइन एज्युकेशन वेबसाइट अनएकेडेमीवर यूजर्सचा डेटा हॅक होण्याची माहीत दिली होती.