संबंधित माहिती
- १७ तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सुचना कराव्यात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
- १० मे पर्यंत परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल : सुप्रिया सुळे
- इंडियन मेडिकल असोसिएशन ने केलेल्या मागण्या मान्य करण्याबाबत...
- मुंबई मनपाने करोना संशयितांच्या नमुन्यांच्या चाचणी बाबतचे नियम बदलले
ठरलं, भूगोलाच्या पेपरचे असे होणार गुणदान
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी भूगोल विषयाचा पेपर रद्द केला आहे. या विषयाच्या विद्यार्थांना गुणदान करण्याबाबतचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थाने दिलेल्या अन्य विषयाच्या लेखी परीक्षेस प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रूपांतर रद्द केलेल्या विषयाच्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचे मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. भूगोल विषयाच्या परिक्षेसह दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षाही रद्द करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनाही या विषयासाठी सरासरी गुण देण्यात येणार आहेत.
