शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जून 2020 (09:43 IST)

अमेरिकेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आल्याचे समजते. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
 
येथे जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर जगभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. 
 
जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अमेरिकेत होणाऱ्या आंदोलनांचे स्वरुप उग्र, हिंसक असून इतर देशांमध्ये देखील नागरिकांनी आपला निषेध नोंदवला.